Thursday, 14 July 2016

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनच्या बांधकामास स्थगिती – महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनच्या बांधकामास स्थगिती
                     महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर
     
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारत प्रस्ताव (शहर) विभागाने सी.एस. क्र. १७ए/७६, दादर नायगांव विभाग, गोकुळदास पास्ता रोड, दादर (पूर्व) येथील आंबेडकर भवन सदनास क्रमांक ईबी/८६४४/एफएस/ए अन्वये दिनांक १३.०४.२०१६  संबंधित ट्रस्टला अमान्यतेची सूचना (Intimation of Disapproval) दिलेली आहे. सदर सुचनेतील अट क्रमांक ८ मध्ये बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र प्राप्त करण्याअगोदर सर्व भाडेकरुंची सहमती घेऊन अस्तित्त्वात असलेले बांधकाम निष्कासित करावे अथवा निष्कासनापूर्वी भाडेकरुंची सहमती घेऊन टप्प्याटप्प्याने निष्कासन व बांधकाम असा आराखडा देऊन मंजूर करुन घ्यावा, असे नमूद करण्यात आलेले आहे. तथापि, सदर ट्रस्टने या अटींचे उल्लंघन केलेले आहे.
मुंबईच्या महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर यांनी दिनांक १२ जुलै, २०१६ रोजी सदर भवनास भेट दिली होती. तसेच काल दिनांक १३ जुलै, २०१६ रोजी महापौर निवास, दादर येथे अधिकाऱयांसमवेत बैठकही घेण्यात आली. या बैठकीस उप आयुक्त (परिमंडळ  २) श्री. आनंद वागराळकर, एफ/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. विश्वास मोटे, कार्यकारी अभियंता श्री. खोत हे उपस्थित होते.
महापालिकेने कलम ३५४ नुसार दिलेल्या नोटीस मधील अटींची पूर्तता योग्यरित्या न केल्यामुळे ट्रस्टने नियमाचे उल्लंघन केले आहे. सदर नोटीशीतील अट क्रमांक ३ नुसार अस्तित्त्वात असलेल्या इमारतीतील सर्व भाडेकरुंना पर्यायी जागा उपलब्ध करुन द्याव्या लागतील. तशी जागा देण्यात आलेली नाही. तसेच त्या ठिकाणच्या वीज व पाणीपुरवठा खंडीत करावा लागतो, ही प्रक्रियाही करण्यात आलेली नाही. इमारत धोकादाकय असल्यामुळे निष्कासित करण्याकरीता त्याचा आराखडा व त्याचे टप्पे तयार करुन निष्कासित करणे गरजेचे होते. त्यामुळे अमान्यतेच्या सुचनेतील, बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागणाऱया अटींची पूर्तता केल्याशिवाय व बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र प्राप्त केल्याशिवाय सदर ठिकाणी पुढे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करु नये, असे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.