Friday, 1 April 2016

विखे पाटील यांनी घेतली पोलीस कुटुंबातील आंदोलक महिलांची भेट प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा

विखे पाटील यांनी घेतली पोलीस कुटुंबातील आंदोलक महिलांची भेट
प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा
मुंबईदि. १ एप्रिल २०१६:



मागील १५ दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर उपोषणास  बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी श्रीमती यशश्री प्रमोद पाटील आणि अन्य आंदोलक महिलांची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी भेट घेतली. याप्रसंगी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आ. पतंगराव कदमआ. जयकुमार गोरे आदी उपस्थित होते.
या भेटीनंतर विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने निर्णय करून त्यांना दिलासा द्यावाअशी मागणी केली. सदरहू आंदोलकांची व्यथा आपण स्वत: जाणून घेऊअसे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विखे पाटील यांना या भेटीत दिले.
पोलीस अंमलदार व त्यांच्या कुटुंबियांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात गेल्या १५ दिवसांपासून पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी आझाद मैदानावर उपोषणास बसलेल्या आहेत. पोलीस अंमलदारांची ड्युटी ८ तासाची करावीसुधारित वेतन निश्चिती करून थकबाकीची रक्कम मिळावीपोलिसांना हक्काची रक्कम मिळावी,महाराष्ट्र पोलीस दलाचे वेतन इतर राज्यांप्रमाणे करण्यात यावेपोलिसांच्या पाल्यांना पोलीस भरतीत १० ते १५ टक्के आरक्षण मिळावेआदी मागण्यांसाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला यशश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात उतरल्या आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सर्व आंदोलनकर्त्या महिलांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले.
तत्पूर्वी विधानसभेतही विखे पाटील यांनी या आंदोलनाकडे सरकाचे लक्ष वेधले. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने आजच तातडीने निर्णय करावा,अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलनकर्त्या महिलांशी बोलताना विखे पाटील म्हणाले कीतुमच्या प्रश्नांचा मी पाठपुरावा मी करीत असूनया संदर्भात विधानसभेतही सरकारचे लक्ष वेधले आहे. या मागण्यांबाबत सरकारला सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडूअसे आश्वासन देतानाच आंदोलक महिलांनी उपोषण मागे घ्यावेअसे आवाहनदेखील त्यांनी केले

No comments:

Post a Comment