माजी मंत्री श्री शंकर नम यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
मुंबई, दि. 3 जून 2015:
शिवसेना नेते व माजी मंत्री श्री शंकर नम यांनी आज आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
येथील गांधी भवनस्थित प्रदेश काँग्रेस कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.श्री अशोक चव्हाण, माजी मंत्री श्री रवीसेठ पाटील, माजी मंत्री श्री राजेंद्र गावीत, पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष श्री मनिष गणोरे आदी उपस्थित होते. श्री शंकर नम 1985 ते 1998 दरम्यान आमदार होते. 1991 ते 1993 पर्यंत ते राज्यमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. 1998 च्या लोकसभा निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले होते. श्री नम यांच्यासमवेत श्री राजकुमार पाटील, श्री कमलाकर गिंभळ, श्री यतीन नम, श्री गितेश पाचळकर, श्री योगेश नम यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
No comments:
Post a Comment