विविध अग्निशमन यंत्रणांचा मुंबई अग्निशमन दलाशी समन्वय आवश्यक
- महापालिका आयुक्त
वडाळा येथील आगीच्या घटनेबाबत संबंधित संस्थांची विशेष बैठक संपन्न
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात असणाऱया विविध संस्थांच्या जागांमध्ये किंवा हद्दींमध्ये लागलेल्या आगींबाबत कार्यवाही करताना महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाशी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी समन्वय साधणे अत्यंत आवश्यक आहे; तसेच या सर्व संस्थांनी आपापल्या परिसराची काळजी घेत असतानाच आपल्या हद्दीसभोवतालच्या परिसराची काळजी घेणे व त्याबाबत अद्ययावत माहिती सदैव तयार ठेवणे गरजेचे आहे, असे आदेश महापालिका आयुक्त तथा बृहन्मुंबई आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. अजोय मेहता यांनी महापालिका हद्दीतील सर्व संबंधित संस्थांना दिले आहेत.
वडाळा येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परिसरात असणाऱया तेलवाहिनीला दिनांक १३.०६.२०१५ रोजी लागलेली मोठी आग मुंबई अग्निशमन दलाने प्रयत्नांची शर्थ करीत रविवार दिनांक १४.०६.२०१५ रोजी आटोक्यात आणली. या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज (दिनांक १५.०६.२०१५ रोजी) सर्व संबंधित संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱयांची विशेष बैठक महापालिका आयुक्त तथा बृहन्मुंबई आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना श्री. मेहता बोलत होते.
या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. संजय देशमुख, संचालक (औद्योगिक सुरक्षा) यांचे प्रतिनिधी यांच्यासह मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, राष्ट्रीय केमिकल्स व फर्टीलायझर्स आदी संस्थांचे वरिष्ठ अधिकारी व महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
...२..
... २ ...
`कोणत्याही आगीच्या घटनेबाबत किंवा आपत्कालिन परिस्थितीबाबत संबंधित संस्थेतील कोणत्या स्तरावरील अधिकाऱयाने महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दल, आपत्कालिन व्यवस्थापन कक्ष यांना कळवावे?' याबाबत सुनिश्चित कार्यपद्धती असण्याची आवश्यकता अधोरेखित करीत महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांनी आगीच्या घटनांबाबत तसेच इतर आपत्कालिन परिस्थितींबाबत सर्व संबंधित संस्थांनी महापालिकेशी समन्वय ठेवून आपत्ती व्यवस्थापन विषयक `सुनिश्चित कार्यपद्धती' (Standard Operating Procedure) तयार करावी असे आदेशित केले.
त्याचबरोबर मुंबई पोर्ट ट्रस्टने पुढील एका महिन्याच्या कालावधीत त्यांच्या सर्व यंत्रणांबाबत आवश्यक त्या सर्व चाचण्या व तपासण्या करुन घेत संबंधित निकषांनुसार कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, तसेच सर्व तेलवाहिन्या गळतीमुक्त होण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना करुन तेलवाहिन्या गळतीमुक्त झाल्याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या सर्वोच्च अधिकाऱयांचे प्रमाणपत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला एक महिन्याच्या आत देण्यात यावे, असेही आदेश महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान दिले.
दरम्यान, आज संपन्न झालेल्या बैठकीला उपस्थित असणाऱया सर्व संबंधित संस्थांच्या अधिकाऱयांनी मुंबई अग्निशमन दलाच्या कार्याचे कौतुक केले.