मालाड (पश्चिम) च्या इव्हरशाईन नगर येथील मुटूमारी भागातील बृहन्मुंबई महापालिकेच्या धोबीघाटासाठी आरक्षित असलेल्या जागेवरील झोपडया निष्कासनाची कारवाई पी/उत्तर विभागाच्या वतीने
(दिनांक २७ मे २०१५) सकाळी ९ वाजेपासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत करण्यात आली. या कारवाईत ६०० ते ७०० झोपडया निष्कासित करण्यात आल्या. घटनास्थळाला अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. संजय देशमुख यांनी भेट दिली. ही कारवाई पी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. देवेंद्रकुमार जैन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता के.एस. गायकवाड व त्यांच्या पथकाने पार पाडली.या कारवाईत ५ जेसीबी, १ पोकलॅड, १२ डंपरचा वापर करण्यात आला. यावेळी पालिकेचे एकूण १०० अधिकारी व कर्मचारी तसेच मालाड पोलिस ठाण्याचे १०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. हा मोकळा भूखंड बॅरेकड्सव्दारे संरक्षित करण्याचे काम सुरु असून उद्यापर्यंत ते काम पूर्ण करण्यात येईल.
No comments:
Post a Comment