Thursday, 14 May 2015

काँग्रेस उपाध्यक्ष राहुलजी गांधी यांचे नांदेडमध्ये जल्लोशात स्वागत तेलंगणा दौ-यादरम्यान धावती भेट







काँग्रेस उपाध्यक्ष श्री राहुलजी गांधी यांचे नांदेडमध्ये जल्लोशात स्वागत
तेलंगणा दौ-यादरम्यान धावती भेट
नांदेड, दि. 14 मे 2015:
काँग्रेस उपाध्यक्ष श्री राहुलजी गांधी यांचे आज सायंकाळी नांदेड विमानतळावर जल्लोशात स्वागत करण्यात आले.
दि. 15 मे 2015 रोजी श्री राहुलजी गांधी तेलंगणा राज्यात पदयात्रा करून शेतक-यांच्या भेटी घेणार आहेत. या पदयात्रेसाठी ते आज नवी दिल्लीहून नांदेडमार्गे तेलंगणाकडे रवाना झाले. नांदेड विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. नांदेडकरांचे स्वागत स्वीकारून काँग्रेस उपाध्यक्ष तेलंगणाकडे रवाना झाले. श्री राहुलजी गांधी यांच्यासमवेत असलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री दिग्विजय सिंह आणि काँग्रेस नेते श्री राज बब्बर यांचेही कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले.
याप्रसंगी नांदेड विमानतळावर आ.श्री वसंत चव्हाण, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री बी.आर. कदम, महापौर सौ. शैलजा किशोर स्वामी, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगलाताई गुंडले, माजी आमदार श्री हनुमंत पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार श्री माधवराव पाटील जवळगावकर, माजी आमदार श्री ओमप्रकाश पोकर्णा, श्री किशोर स्वामी, उपमहापौर श्री शफी अहमद कुरेशी, माजी महापौर श्री अब्दुल सत्तार, माजी जि.प. अध्यक्ष श्री दिलीप पाटील बेटमोगरेकर, काँग्रेस अल्पसंख्यक विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री शमिम अब्दुला, उपाध्यक्ष श्री मसूद खान, मनपा सभागृह नेते श्री विरेंद्रसिंग गाडीवाले, मनपा सभापती श्री विनय गिरडे पाटील, नांदेड लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री पप्पू पाटील कोंडेकर, युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस श्री केदार पाटील साळुंखे, उपाध्यक्ष श्री प्रवीण पोकर्णा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment