उत्तराखंडमध्ये लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- खा. अशोक चव्हाण
मुंबई, दि. २८ मार्च, २०१६:
अरुणाचल प्रदेशपाठोपाठ उत्तराखंडातही राष्ट्रपती राजवट लागू करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.
उत्तराखंडामध्ये राष्ट्रपती राजवट प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करताना खा. चव्हाण म्हणाले की, सत्ताधारी भाजपने विरोधकांवर कुरघोडी करण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करीत कॉंग्रेसशासित राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे द्वेषाचे राजकारण सुरु केले आहे. केंद्र सरकारने कॉंग्रेसची सत्ता असलेल्या अरुणाचल प्रदेश पाठोपाठ उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे, हे प्रकार लोकशाहीसाठी घातक आहेत. यावरूनच सत्ताधारी भाजपला लोकशाही मान्य नसल्याचे दिसून येते, असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.
No comments:
Post a Comment