मथुरेतील ‘त्या’ हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या!
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची सरकारकडे मागणी
मुंबई, दि. ३१ मार्च २०१६:
भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याचा मथुरेमध्ये सहकाऱ्याकडून झालेल्या विनयभंग प्रकरणी संबंधित हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज राज्य सरकारने तातडीने ताब्यात घ्यावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
आज विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करताना विखे पाटील म्हणाले की, राज्य सरकार या प्रकरणाची सत्यता समोर आणू इच्छित असेल तर सर्वप्रथम मथुरेतील हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने तिचा सहकारी व भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष गणेश पांडे यांच्या विरुद्ध केलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे. या घटनेची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी हे सीसीटीव्ही फुटेज महत्वाचा पुरावा ठरणार आहे. त्यामुळे हे फुटेज राज्य सरकारकडे उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे विरोधी पक्षनेते म्हणाले.
No comments:
Post a Comment