Thursday, 23 April 2015

‘ई’ विभागातील सिद्धार्थ नगर येथील इमारत धोकादायक सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे पालिका प्रशासनाचे रहिवाश्यांना आवाहन

विभागातील सिद्धार्थ नगर येथील इमारत धोकादायक
सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे पालिका प्रशासनाचे रहिवाश्यांना आवाहन
     विभागातील सिद्धार्थ नगर येथील AA1, BB1, C,D,E,F या इमारती संरचना परिक्षकांच्या अहवालानुसार धोकादायक म्हणून सुचविल्यानुसार इमारतींना टेकू देऊन स्थिर ठेवणे आवश्यक आहे. परंतु, सदर इमारतीतील रहिवाशी कंत्राटदाराला टेकू लावण्यासाठी प्रतिबंध करीत आहेत. कंत्राटदारांना टेकू लावण्याच्या कामाचे कंत्राट हे दिनांक ३१ मार्च, २०१५ पर्यंत होते. सदर इमारत ही धोकादायक असल्याने स्थानिक रहिवाश्यांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे महापालिका प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे.
     स्थलांतर न करता तेथेच राहणाऱया रहिवाश्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर रहावे, नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास व जीवित अथवा वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महापालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असेही पालिका प्रशासनाने कळविले आहे.


No comments:

Post a Comment