Thursday, 4 February 2016

जातीभेद मिटविण्यासाठी आन्तरजातीय विवाहांना प्रोत्साहन द्या-रामदास आठवले वाढत्या प्रतिसादामुळे भारत भीम यात्रेचा समारोप 1मे रोजी करणार

 जातीभेद मिटविण्यासाठी आन्तरजातीय विवाहांना प्रोत्साहन द्या-रामदास आठवले
वाढत्या प्रतिसादामुळे भारत भीम यात्रेचा समारोप 1मे रोजी करणार


बेंगलुरु जातिभेद मिटविण्यासाठी आन्तरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले पाहिजे
दलित सवर्णांमध्ये रोटिबेटी चे व्यवहार झाले पाहिजेत जाती अंतासाठी आन्तरजातीय विवाह व्हावेत यासाठी शासनाने समाज प्रबोधन आणि प्रोत्साहन दिले पाहिजे त्यामुळे ऑनर किलिंग चे  प्रकार रोखता येतील ज्या जिल्ह्यात  जास्त आन्तरजातीय विवाह होतील त्या जिल्ह्यास   25 कोटी चा विकासनिधी  बक्षीस देण्यात यावेत  ही योजना   सम्पूर्ण देशात सुरु करावी  अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यांनी बेंगलुरु येथे केली   येथील सिटी मार्केट मैदानात रिपब्लिकन पक्षाच्या  कर्नाटक राज्य शाखेच्या वतीने  भारत भीम यात्रेच्या स्वागतार्थ आयोजित सभेत आठवले बोलत होते यावेळी रिपाइं कर्नाटक चे प्रदेश अध्यक्ष डॉ एम वेंकटस्वामी मोहनलाल पाटिल नरसिंघ पटेल  सुरेश बरशिंग हुबळी विधानसभा रिपाइं उमेदवार  नगरत्नम्मा तसेच सुनंदा माँ ;प्रभावती उदय आनंद महेंद्र शिर्के मुस्तकीन खान महेंद्र निकलजे विनोद निकलजे हेमंत रणपिसे दीपक पटेल हुसैन बक्ष अदि उपस्थितीत होते
 भारत भीम यात्रेला देशभर प्रतिसाद वाढत असल्याने यात्रेचा समारोप 24 एप्रिल ऐवजी 1 मे रोजी  जागतिक कामगार दिनी  करणार असल्याची  घोषणा आठवलेंनी केली

No comments:

Post a Comment