१४ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची उदया सांगता
०२ फेब्रुवारी, २०१६
लघुपट, माहितीपट, ॲनिमेशनपट, चित्रपट विषयक कार्यशाळा, चर्चासत्र अशी अनोखी पर्वणी ठरलेल्या १४ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची उद्या सांगता होणार आहे. मुंबईतील रविंद्र नाटयमंदीर येथे संध्याकाळी ५ वाजता एका दिमाखदार सोहळयात महोत्सवाचा समारोप होणार आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव या सोहळयाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांच्या अध्यक्षतेखाली हा महोत्सव होईल. मिफ्फ २०१६ चे ब्रँड अँम्बेसिडर जॅकी श्रॉफ यांच्यासह राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, जेष्ट चित्रपट निर्माते रमेश सिप्पी तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव सुनिल अरोरा यांचीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असेल.
महोत्सवातील उत्कृष्ट लघूपट, माहितीपट आणि ॲनिमेशन पटांना यावेळी पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. पुरस्कार प्राप्त काही लघुपटांच्या प्रदर्शनाचा आस्वादही रसिक प्रेक्षकांना यावेळी घेता येईल.
सांगता समारंभाचे थेट प्रक्षेपण मुंबई दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवरुन केले जाणार आहे.
No comments:
Post a Comment