Tuesday, 15 December 2015

ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६० वर्षे! विखे पाटील यांच्या लक्षवेधीवर सरकारचा निर्णय

ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६० वर्षे!
विखे पाटील यांच्या लक्षवेधीवर सरकारचा निर्णय
नागपूर, दि. १५ डिसेंबर २०१५:
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारलेल्या लक्षवेधीवरील चर्चेमध्ये ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६० वर्षे करण्याची घोषणा राज्य सरकारचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज केली.
विखे पाटील यांनी आज लक्षवेधी सूचनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले होते. या संदर्भातील चर्चेमध्ये बोलताना बडोले यांनी ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६० वर्षे करण्याचा निर्णय जाहीर केला. याप्रसंगी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली.
...........

No comments:

Post a Comment