Monday, 28 December 2015

टिळक भवनमध्ये काँग्रेस स्थापना दिवस साजरा





टिळक भवनमध्ये काँग्रेस स्थापना दिवस साजरा
मुंबई, दि. 28 डिसेंबर 2015:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस स्थापना दिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी खा. चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सेवादलाने ध्वजाला मानवंदना दिली. आज काँग्रेस स्थापना दिवसासह सेवादलाचा दल दिवसही होता. त्यानिमित्त सुशीलकुमार शिंदे व इतर नेत्यांनी सेवादलाच्या कार्यकर्त्यांसह प्रतीज्ञापत्राचे सामूहिक वाचन केले.
उपस्थितांना संबोधित करताना खा. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. ते म्हणाले की, स्थापना झाल्यापासून सलग 130 वर्ष काँग्रेसने देशसेवेचा वसा कायम ठेवला आहे. त्यासाठी काँग्रेसला बलिदानेही द्यावी लागली. परंतु, पक्ष आपल्या विचारधारेपासून ढळला नाही. पुढील काळातही काँग्रेसचे कार्यकर्ते देशासाठी, समाजातील वंचित घटकांसाठी काम करीत राहतील.
या कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, बाबू थॉमस, अॅड. महादेवराव शेलार, यशवंत हाप्पे, राजन भोसले, राजेश शर्मा, सेवादलचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा, इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे आदी पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment