Tuesday, 8 December 2015

रस्ते दुरुस्तीची कामे ७ ऐवजी २४ तास करण्यास वाहतूक पोलिसांनी दिली परवानगी

शहर भागातील रस्ते दुरुस्तीची कामे आता लवकर पूर्ण करणे शक्य !

रस्ते दुरुस्तीची कामे ७ ऐवजी २४ तास करण्यास वाहतूक पोलिसांनी दिली परवानगी

महापालिका व मुंबई पोलिस यांच्यातील सुसंवादाचा सकारात्मक परिणाम

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील शहर विभागात असणा-या रस्त्यांची दुरुस्ती कामे वाहतूक पोलीसांच्या परवानगीने केवळ रात्रीच करत येत असतज्यामुळे सदर कामे पूर्ण होण्यास अधिक कालावधी लागत असेमात्र आता शहर विभागात रस्ते दुरुस्तीची कामे २४ तास करण्यास मुंबई वाहतूक पोलिसांनी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहेज्यामुळे साहजिकच रस्ते दुरुस्तीची कामे पूर्वीपेक्षा अधिक वेगाने व कमी कालावधीत करणे शक्य होणार आहे

बृहन्मुंबई महापालिकेच्या शहर विभागात रस्ते दुरुस्तीची कामे करावयाची झाल्यास सदर कामे वाहतूक पोलिसांच्या संबंधित परवानगी नुसार केवळ रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत करता येत असतज्यामुळे साहजिकच रस्ते दुरुस्ती करण्यास अधिक वेळ लागत असेमात्र आता शहर विभागातील रस्ता दुरुस्तीची कामे २४ तास करण्यास मुंबई वाहतूक पोलिसांनी परवानगी दिली आहे.

यानुसार प्राप्त झालेल्या पहिल्या पत्रानुसार २६ ठिकाणी प्रस्तावित असणा-या रस्ते दुरुस्तीसाठी परवानगी मिळालेली आहेयामध्ये प्रामुख्याने ताडदेव,मलबार हिलपायधुनीकाळबादेवीभायखळानागपाडामाटुंगाभोईवाडा,वडाळावरळीमाहिम आणि कुलाबा यापरिसरातील रस्ते आहेत

ही सर्व रस्ते दुरुस्तीची कामे वाहतूक पोलीसांच्या सल्ल्यानुसार व वाहतूकीला अडथळा होणार नाहीत अशा पद्धतीने करणे व ध्वनी मर्यादा पाळणे संबंधित कंत्राटदारांना आवश्यक असणार आहेमात्र ही कामे करताना चौकातील(Junction) खोदकाम विषयक कामे मात्र पूर्वीप्रमाणेच रात्री ११ ते सकाळी ६ या दरम्यान करणे आवश्यक असणार आहे.

महापालिका व मुंबई पोलीस यांच्यातील संवाद वाढावा व नागरी सेवा सुविधा विषयक बाबींची कार्यवाही अधिक वेगाने व्हावीयादृष्टीने महापालिका आयुक्त श्रीअजोय मेहता व पोलिस आयुक्त (मुंबईश्रीजावेद अहमद यांनी पुढाकार घेतला आहेया अनुषंगाने महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्त (मुंबईयांच्यात सप्टेंबर २०१५ पासून समन्वय बैठक व पाहणी दौरे आयोजित करण्यात येत आहेततसेच परिमंडळीय स्तरावर देखील दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी महापालिकेच्या सर्व सातही परिमंडळाचे उपायुक्त व मुंबई पोलीस दलाच्या सर्व संबंधित परिमंडळांचे अतिरिक्त पोलीस आयुक्तपोलीस उपायुक्त यांच्यात समन्वय बैठका आयोजित करण्यात येत आहेत.

या सर्व सुसंवादाचा सकारात्मक परिणाम विविध कार्यवाहींच्या अनुषंगाने आता दिसू लागला आहेयाच सुसंवादातून आता रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे २४ तास करता येणे शक्य झाले आहेज्यामुळे सदर कामे अधिक वेगाने करणे शक्य होणार आहे.

No comments:

Post a Comment