ऊर्जा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची
उपसमिती गठित करण्याचा कॅबिनेटचा निर्णय
मुंबई, 24 मे
विदर्भ-मराठवाडा या भागातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी या विभागाचा व उर्वरित महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड या प्रदेशातील औद्योगिक विकास आणि उदयोगांना देण्यात आलेल्या वीजदराचा तुलनात्मक अभ्यास करून वीज दराबाबत अहवाल सादर करण्यासाठी विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यास समितीचे गठन करण्यात आले. या समितीने औद्योगिकदृष्टया प्रगत आणि मागास भागाचा वीजदराबाबतचा अभ्यास करून आपला अहवाल शासनाला सादर केला. यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. दोन्ही समितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सादर केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा अहवाल कॅबिनेट समोर ठेवला. मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊन ऊर्जामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
औद्योगिक वीज ग्राहकांना वीज दरात सवलत देण्यासाठी मंत्रिमंडळाने आज गठीत केलेली उपसमिती वीज दराचा अधिक अभ्यास करून उद्योगांना योग्य प्रकारे सवलतींचा फायदा कसा देता येईल या संदर्भातही विचार करेल. विदर्भ मराठवाडयातील उद्योगांना वीज दरात सवलत देण्याचे अश्वासन शासनाने दिले होते. या उपसमिती चे गठन म्हणजे शासनाने दिलेला आश्वासन पाळण्यासाठी उचललेले एक महत्वपूर्ण पाउल म्हणावे लागेल.
No comments:
Post a Comment