महापालिका आयुक्तांनी अचानक भेटी देऊन केली रस्ते विषयक कामांची पाहणी
जी /दक्षिण व एल विभागात रस्त्यांच्या बाजूचे बांधकाम साहित्य २४ तासात हटविण्याचे आदेश
बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे शहर व पूर्व उपनगरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या रस्ते विषयक कामांची महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांनी आज अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान शहरातील डी, ई, जी / दक्षिण,जी / उत्तर तर पूर्व उपनगरातील एल, एम / पूर्व व एम / पश्चिम या प्रशासकीय विभागात सुरु असलेल्या कामांची पाहणी केली.
या पाहणी दरम्यान शहरातील जी / दक्षिण विभागातील सात रस्ता ते चिंचपोकळी या साने गुरुजी मार्गावरील व पूर्व उपनगरातील एल विभागातील शीव स्टेशन ते एससीएलआर या लालबहादूर शास्त्री मार्गावरील रस्त्यांच्या बाजूला बांधकाम साहित्य पडलेले आढळून आले. सदर बांधकाम साहित्य पुढील २४ तासात हटविण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी संबंधित सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. आज झालेल्या पाहणी दौ-यात उपायुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. रमेश पवार हे सहभागी होते.
No comments:
Post a Comment