साहित्य क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्व हरपले!
प्रा. रा. ग. जाधव यांच्या निधनावर विखे पाटील यांची प्रतिक्रिया
मुंबई, २७ मे २०१६:
ज्येष्ठ लेखक, समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुखःद असून,त्यांच्या रूपाने साहित्य क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व हरपल्याची प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षेनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
प्रा. जाधव यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, मराठी साहित्य क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून विविध साहित्य प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले. त्यांची ‘निळी पहाट‘, ‘संध्यासमयीच्या गुजगोष्टी’, ‘समीक्षेतील अवतरणे’ आदी पुस्तके मोठ्या प्रमाणात गाजली. प्रा. जाधव यांनी ३७ काव्यसंग्रहांचे परिक्षण केले असून मराठी विश्वकोषातही त्यांचे मोलाचे योगदान होते. तसेच त्यांनी औरंगाबाद येथे २००४ मध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. राज्य शासनातर्फे प्रा. जाधव यांना २०१५ वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
No comments:
Post a Comment