शिवाजी नगर, गोवंडी येथील रस्ता क्रमांक १४ वाहतूकीसाठीझाला मोकळा
६० फूटी रस्त्यावरील १० वर्षांपासून असलेली अतिक्रमणे हटविली
महापालिकेच्या 'एम पूर्व' विभागाची धडक कारवाई
बृहन्मुंबई महापालिकेच्या 'एम पूर्व' विभागातील गोवंडी परिसरात असणा-या शिवाजी नगर भागातील रस्ता क्रमांक १४ या ६० फूटी रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणांमुळे हा रस्ता गेली सुमारे १० वर्षे अतिशय अरुंद झाला होता. या अतिक्रमणांमध्ये प्रामुख्याने ८२ झोपड्यांचा समावेश होता. यामुळे या रस्त्यावरील वाहतूकीला देखील मोठ्या प्रमाणात अडथळा तयार झाला होता. तसेच शिवाजी नगर बस स्थानक असणा-या ९० फूटी रस्त्याकडे जाण्यास देखील अडसर उत्पन्न झाला होता. परिमंडळ – ५ चे उपायुक्त श्री. भारत मराठे यांच्या मार्गदर्शनानुसार एम / पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. श्रीनिवास किलजे यांच्या नेतृत्वात या अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात येऊन हा रस्ता आता मोकळा करण्यात आला आहे.
एम / पूर्व विभागाद्वारे दि. २० व २१ सप्टेंबर या दोन दिवशी करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान रस्ता क्रमांक १४ वर असणा-या ८२ झोपड्या निष्कासित करण्यात आल्या आहेत. यामुळे स्थानिक रहिवाशांना शिवाजी नगर बस स्थानकाकडे व ९० फूटी रस्त्याकडे जाण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे. रस्ता क्रमांक १४ वरील कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस दलाचे विशेष सहकार्य महापालिकेला लाभले. ही कारवाई करण्यासाठी महापालिकेचे सुमारे ४० कामगार – कर्मचारी - अधिकारी यांच्यासह ६७ मुंबई पोलीस कार्यरत होते. तसेच २ जेसीबी व ८ डंपर यांचाही वापर करण्यात आला.
No comments:
Post a Comment