Monday, 26 September 2016

मुख्यमंत्र्यांना खुर्ची जाईल अशी भीती का वाटते? सचिन सावंत

मुख्यमंत्र्यांना खुर्ची जाईल अशी भीती का वाटते? सचिन सावंत

राज्यात विविध ठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत, हे मोर्चे मराठा समाजाच्या मागण्यांकरिता असून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीविरोधात नाहीत. तरीही मुख्यमंत्र्यांना खुर्चीची भिती का वाटत आहे, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. गांधीभवन येथे पत्रकारांशी बोलताना सचिन सावंत म्हणाले की,  मराठा समाज कितीही लढवय्या असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील व भाजपमधील मराठा नेते अतिशय भेदरलेले आणि दबलेले आहेत. खडसेंवरील कारवाईनंतर त्यात अधिकच भर पडली आहे, त्यामुळे मराठा या समाजातील‘म’ चा उच्चार करण्यासाही त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे या नेत्यांपासून मुख्यमंत्र्यांना कोणताही धोका नाही असे प्रतिपादन सावंत यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांना संघ परिवाराचा पूर्ण पाठिंबा आहे, त्यामुळे त्यांनी खुर्चीची भीती सोडून मराठा समाजाच्या मागण्याबाबत काय कारवाई करणार, याचे उत्तर द्यावे अशी मागणी सावंत यांनी केली आहे. पाच लाख मराठा तरूणांना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रशिक्षित करणार असे मुख्यमंत्री म्हणाले, पण फक्त मराठा समाजालाच त्याचा लाभ कसा होईल याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे अशी मागणी सावंत यांनी केली आहे. कौशल्य विकास कार्यक्रमानंतरही अनेक तरूणांना रोजगार मिळालेला नाही असे सावंत म्हणाले. 

No comments:

Post a Comment