Wednesday, 21 September 2016

राज्यातील सर्व ग्रामपंचायती अंतर्गत नळ येाजना सौर ऊर्जेवर आणण्याचे ऊर्जामंत्र्यांचे निर्देशमहाऊर्जा नियामक मंडळाची आढावा बैठक



राज्यातील सर्व ग्रामपंचायती अंतर्गत नळ येाजना सौर ऊर्जेवर 
आणण्याचे ऊर्जामंत्र्यांचे निर्देशमहाऊर्जा नियामक मंडळाची आढावा बैठक

मुंबई/नागपूर, 21 सष्टेंबर, 
राज्यातील सर्व ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या नळ योजना सौर ऊर्जेवर आणून त्या नळ योजनांवर अल्ट्रा वॉटर फिल्टर लावण्यात यावे. येत्या 2 वर्षात हे काम पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाऊर्जा प्रशासनाला आज दिले.
मुंबईत मंत्रालयात आज ऊर्जामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाऊर्जाच्या नियामक मंडळाची आढावा बैठक झाली. या बैठकीत 2 वर्षात सर्व ग्रामपंचायतीकडे असलेल्या नळ योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे लक्ष्य महाऊर्जाला देण्यात आले. या बैठकीला ऊर्जा सचिव बिपीन श्रीमाळी, महाऊर्जाचे महासंचालक नितीन गद्रे, मराविमं सुत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक, महाऊर्जाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक पुरुषोत्तम जाधव, महाव्यवस्थापक उमाकांत पांडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नळ योजनांमध्ये आदिवासी, माडा, मिनी माडा, दुर्गम भागात येणाऱ्या ग्रामपंचायतीचा समावेश होणार आहे. यासाठी संबंधीत विभागाकडून निधीची व्यवस्था करण्यात येईल. तसेच आदिवासी व नक्षलग्रस्त भागात सौर नळयोजना व पथदिवे प्राधान्याने लावण्याच्या सूचना ऊर्जामंत्र्यांनी केल्या. पथदिवे लावताना बॅटरी बॅकसह पथदिवे लावण्यात यावे. शंभर टक्के ऑफ ग्रिड पॉलीसी अंतर्गत सर्व पथदिवे लावावेत. यासाठी किती खर्च लागणार याचा अभ्यास करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही ऊर्जामंत्र्यांनी दिले.
अटल सौर कृषीपंप योजनेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या योजने अंतर्गत लावण्यात येणारे कृषीपंपाचे उदघाटन संबंधित जिल्हयातील लोकप्रतिनिधीच्या हस्ते करण्यात यावे. गावातील ग्रामपंचायत सरपंच, पोलीस यांच्या हस्तेही उदघाटन करण्यात यावे, असे निर्देशही ऊर्जामंत्र्यांनी दिले.
तसेच, बीई इलेक्ट्रीकल, बेरोजगार अभियंत्यांना महाऊर्जाची कामे देता येतील काय, यावर अभ्यास करुन 15 लाखांपर्यंतची कामे या बेरोजगार अभियंत्यांना द्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते व नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी ग्रीन बिल्डींग संदर्भात एक कार्यशाळा यापूर्वी झाली असून सर्व जिल्हयात अशा कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सौर ऊर्जेबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने महाऊर्जाने ऊर्जाबचत आठवडा राबवण्यात आला. तसेच राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तराव चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. याशिवाय विविध कार्यशाळा घेऊन त्यातून महाऊर्जाच्या योजनांबदल जनजागृतीचा कार्यक्रम राबवण्यात आला. केंद्र शासनाच्या निधीतून “उजाला महाराष्ट्र” हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. तसेच सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत 23 जिल्हयात 660 जणांना प्रशिक्षण देण्यात आले. पुण्याचे राजभवन कार्यालय पूर्णपणे सौर ऊर्जेवर घेण्यात येत आहे. येरवडा जेल, पुणे येथे सोलर कुकिंग योजना राबवण्यात येत आहे. साईबाबा संस्थान शिर्डी येथे सोलर कूकरचा उपयोग करुन स्वयंपाक केला जातो. हजारो भाविकांना मिळणारा महाप्रसाद सोलर कुकरच्या माध्यमातून तयार केला जातो.
या आढावा बैठकीत सौर कृषी फीडर, सौर ऊर्जेवर लिप्ट इरिगेशन योजना, सौर फवारणी यंत्र, सर्व शासकीय इमारतींवर रूफटॉप सोलर, महाऊर्जा व महानिर्मिती यांच्या माध्यमातून राबवण्यात येणारे प्रकल्प, औद्योगिक व कृषी साहित्यावर वीज निर्मिती, ग्रीड धोरण, नेट मिटरींग धोरण, ऑफ ग्रीड पॉलीसी लक्ष्य पूर्ण करणे, विंड एनर्जी अशा विविध विषयांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

No comments:

Post a Comment