पश्चिम उपनगरांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई
अतिक्रमण निर्मूलन खात्याद्वारे १४९ हातगाड्या, ६५ शेगड्या व ६३ सिलेंडर्स जप्त
जप्त केलेल्या १४९ हातगाड्या नष्ट करणार, तर शेगड्यांचा लिलाव करणार
अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. श्रीमती पल्लवी दराडे आणि 'अतिक्रमण निर्मूलन व फेरीवाल्यांचे नियमन' संबंधित खात्यांचे उपायुक्त श्री. मिलिन सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार पश्चिम उपनगरांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान १४९ चारचाकी हातगाड्या, ६५ शेगड्या व ६३ सिलेंडर्स जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या अनधिकृत चारचाकी हातगाड्या दंड जमा करुन सोडल्यास किंवा लिलावात विकल्यास त्या परत अनधिकृत व्यवसायांसाठी वापरल्या जाण्याचा पूर्वानुभव लक्षात घेता जप्त करण्यात आलेल्या या हातगाड्या नष्ट करण्यात येणार आहेत, तर जप्त करण्यात आलेल्या शेगड्यांचा लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती उपअनुज्ञापन अधिक्षक (प.उ.) श्री. प्रकाश जाधव यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment