Saturday, 24 September 2016

दलित अट्रॉसिटी कायदा रद्द करण्याला मुंबई काँग्रेसचा ठाम विरोध आणि मराठा आरक्षणाबाबत काँग्रेसचा पूर्ण पाठींबा – संजय निरुपम...

दलित अट्रॉसिटी कायदा रद्द करण्याला मुंबई काँग्रेसचा ठाम विरोध आणि मराठा आरक्षणाबाबत काँग्रेसचा पूर्ण पाठींबा – संजय निरुपम...

 मुंबई/ मराठा समाजाच्या मराठा मूक मोर्चा संदर्भात आणि दलित अट्रॉसिटी कायद्याबाबत मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील काँग्रेसच्या सर्व मराठा आणि दलित नेत्यांची मुंबई काँग्रेस कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत चर्चेमध्ये असा विषय निघाला की महाराष्ट्रामध्ये समाजात तेढ निर्माण करण्याचे षड्यंत्र होत आहे का?भारतीय घटनेने या देशात समता मूलक समाजाची स्थापना करण्यासाठी जी व्यवस्था केली आहे. ती अखंडित राहायला हवी. अट्रॉसिटी कायदा आणि मराठा समाजासाठी आरक्षणाची व्यवस्था ही काँग्रेस पक्षाची समाजाला देण आहे. आज जे लोक सत्तेत आहेत त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी या व्यवस्थेला तडा जाऊ देऊ नये. अट्रॉसिटी कायद्याचा जर गैरवापर होत असेल तर तो थांबवायलाच हवा. पण याचा आधार घेऊन जर हा कायदा रद्द करण्याचे षड्यंत्र होत असेल तर त्याला काँग्रेस पक्षाचा ठाम विरोध आहे. आज जे लोक सत्तेत आहेत त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी व्यवस्था अशीच सुरळीत सुरु ठेवावी. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी जो मूक मोर्चा काढला जात आहे,त्यांच्या या लढ्याला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिबा आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या या लढ्यामध्ये नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे. असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.  

No comments:

Post a Comment