व्यंगचित्रातून मराठा क्रांती मोर्चातील माता भगिनी आणि उरी दहशतवादी हल्ल्यातील शहिदांची हेटाळणी करणा-या शिवसेनेचा तीव्र निषेधः सचिन सावंत
शिवसेनाच महाराष्ट्राच्या राजकारणातील व्यंगचित्र
मुंबई, दि. 26 सप्टेंबर 2016: राज्यभरात उस्फूर्तेपणे निघणा-या मराठा क्रांती महामोर्चात सहभागी माता भगिनी आणि जम्मू काश्मीरच्या उरी येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या सैनिकांची दैनिक सामनाच्या व्यंगचित्रातून हेटाळणी करण्यात आली आहे, याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेनेचा तीव्र निषेध केला आहे. गांधीभवन येथे पत्रकारांशी बोलताना सचिन सावंत म्हणाले की, शिवसेनेचे मुखपत्र‘सामना’च्या 25 सप्टेंबर 2016 रोजीच्या अंकात उत्सव या पुरवणीत व्यंगचित्राद्वारे सध्याच्या मराठा समाजाच्या आंदोलनाची हेटाळणी तर करण्यात आली आहेच, परंतु या महामोर्चामध्ये सहभागी झालेल्या माता भगिनींची अवमाननाही करण्यात आली आहे. आपल्या न्याय मागण्यासाठी सकल मराठा समाजाने राज्यभरात विविध ठिकाणी आदर्शवत महा मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला मुका मोर्चा असे संबोधून या मोर्चात सहभागी लाखो माता भगिनींची अवमानना ‘सामना’च्या व्यंगचित्रातून कऱण्यात आली आहे. लाखोंच्या विक्रमी गर्दीचे अत्यंत शिस्तबध्द आणि शांततेने निघणारे मोर्चे ऐतिहासीक आहेत. या मोर्चात सहभागी होणा-या माता भगिनी स्वतःला शिवराय आणि भिमरायाची लेक समजतात पण शिवसेनेला शिवरायही कळले नाहीl आणि भिमरायही कळले नाहीत, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेला राहिला नाही अशी टीका सावंत यांनी केली. व्यंगचित्रातून या महामोर्चाची हेटाळणी करणे म्हणजे मोर्चात सहभागी होणा-या लाखो मराठा माता-भगिनी आणि बांधवांचा अपमान करणे आहे अशा विकृत प्रवृत्तींचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे. शिवसेना स्वतःच एक व्यंगचित्र झाली आहे, असे सावंत म्हणाले. फक्त मराठा माता भगिनीच नाही तर उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा अवमानही या व्यंगचित्रातून करण्यात आला आहे. उरी येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये भारतमातेचे वीर जवान शहीद झाले आहेत. महाराष्ट्राच्या चार सुपुत्रांनाही दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. संपूर्ण देश जवानांच्या मृत्युमुळे दुःखात असताना ‘सामना’सारख्या वर्तमानपत्राने अत्यंत बेजबाबदारपणे व्यंगचित्रातून शहिदांची हेटाळणी करणे हे चुकीचे असून शिवसेनेने माफी मागावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे
No comments:
Post a Comment