Thursday, 22 September 2016

'अंधेरी पश्चिम' परिसरातील ना. सी. फडके मार्गावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

'अंधेरी पश्चिमपरिसरातील नासीफडके मार्गावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई !


आतापर्यंत ७८ अनधिकृत बांधकामे तोडलीउर्वरित २० बांधकामांवर उद्या कारवाई


महापालिकेच्या 'के पश्चिमविभागाची धडक कारवाई




बृहन्मुंबई महापालिकेच्या 'के पश्चिमविभागातील नासीफडके मार्गाच्या कडेला असणा-या अनधिकृत बांधकामांमुळे रस्ता रुंदीकरणासह पर्जन्यजल वाहिन्यांची कामे रखडलेली होतीयामुळे वाहतूकीला अडथळा येण्याबरोबरच पर्जन्यजल वाहिन्यांच्या कामातही अडथळा येत असल्याने या भागात पावसाचे पाणी साचण्याची शक्यता वाढलेली होतीपरिमंडळ ४ चे उपायुक्त श्रीकिरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात येऊन आतापर्यंत ७८ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहेततर उर्वरित २० बांधकामांवर दि२३ सप्टेंबर रोजी कारवाई होणे अपेक्षित आहेअशी माहिती 'के पश्चिमविभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीपराग मसुरकर यांनी दिली आहे.

के पश्चिमविभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीपराग मसुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नासीफडके मार्गांवरील अनधिकृत बांधकामांवर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सलग दोन दिवस कारवाई करण्यात आली होतीया कारवाई दरम्यान एकूण ६० अनधिकृत बांधकामे अतिक्रमणे हटविण्यात आली होतीत्यांनतर आज दि२२ सप्टेंबर २०१६ रोजी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान १८ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहेततर उर्वरित २० बांधकामे दि२३ सप्टेंबर २०१६ रोजी निष्कासित करणे अपेक्षित आहेयानुसार अंधेरी पश्चिम परिसरातील नासीफडके मार्गावर असणा-या ९८ अनधिकृत बांधकामांपैकी ७८ बांधकामे तोडण्यात आली आहेत.

नासीफडके मार्गावरील कारवाईसाठी मुंबई पोलीस दलाच्या अखत्यारितील डीएननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्रीधनाजी नलावडे व त्यांच्या ३४ जणांच्या चमूचे विशेष सहकार्य महापालिकेच्या पथकाला लाभलेया कारवाईसाठी २ जेसीबी३ डम्पर व २'लॉरीवाहन वापरण्यात आलेसहाय्यक अभियंता (परिरक्षणश्रीसंजय बोरसेदुय्यम अभियंता रमेश गिरगावकर व कनिष्ठ अभियंता विक्की शर्मा यांच्यासह महापालिकेच्या २५ जणांच्या चमूने ही कारवाई केली आहेअशीही माहिती सहाय्यक आयुक्त श्रीपराग मसुरकर यांनी दिली आहेया कारवाईमुळे नासीफडके मार्गाच्या रुंदीकरणास तसेच रुंदीकरणाच्या खाली पर्जन्यजल वाहिन्यांची बांधकामे करण्यास मदत होणार आहे

No comments:

Post a Comment