Monday, 26 September 2016

मतदार जनजागृतीबाबतची महारॅली संपन्न

मतदार जनजागृतीबाबतची महारॅली संपन्न  

 मतदार जागृती व त्या अनुषंगाने मतदार नोंदणी मोठया प्रमाणात व्हावी, म्हणून  बृहन्मुंबई महानगरपालिका आणि घाटकोपर मधील रामजी आसर विद्यालय संचलित लक्ष्मीचंद गोलवाला वाणिज्य व अर्थमहाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज (सोमवार दिनांक २६.०९.२०१६ रोजी) रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.           मुंबई महानगरपालिकेच्या येत्या फेब्रुवारी २०१७ मधील निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार, जिल्हाधिकारी (शहर) व जिल्हाधिकारी (उपनगर) यांनी तयार केलेली मतदार यादी वापरायची असून, विधानसभेच्या ०१.०१.२०१७ रोजीच्या मतदार यादीत नाव असणाऱयांनाच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करता येईल. छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम १५.०९.२०१६ पासून १४.१०.२०१६ पर्यंत चालू राहणार असून, या कालावधीत  ०१.०१.२०१७ रोजी, १८ वर्षे पूर्ण करणाऱया युवक-युवतींच्या नावाची मतदार म्हणून नोंद करण्यात येणार आहे. मतदार नोंदणी मोठया प्रमाणात व्हावी, यासाठी शहर व उपनगरातील १२३  महाविद्यालये तसेच शहर व उपनगर जिल्हाधिकाऱयांकडून जवळपास ८५० केंद्रे आणि महानगरपालिकेची २४ विभाग कार्यालये मतदान नोंदणीसाठी सज्ज झालेली आहेत. त्यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग  यांसह तन्ना ज्युनिअर कॉलेज व एमडी भाटीया हायस्कूल यांच्याही शिक्षकानी व विद्यार्थ्यांनी, संस्थेच्या पदाधिकाऱयांनी, सर्व प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. रॅलीचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष धीरुभाई मेहता व एन विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुधांशु  द्विवेदी यांच्या हस्ते सकाळी करण्यात आले. त्यावेळी  निवडणूक विभागाचे निरीक्षक सत्यवान मेस्त्री, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ए.डी.वंजारी, संस्थेचे सचिव देवेंद्रभाई शहा, एन विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भोसले उपस्थित होते.या रॅलीमध्ये जवळपास ३००० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांचे शिस्तबध्द संचलन, जनजागृती व मतदार नोंदणीबाबतच्या प्रभावी घोषणा यामुळे सर्व परिसर नागरिकांचे आकर्षण ठरले होते. ही रॅली लक्ष्मीबाई गोलवाला महाविद्यालयाकडून राजावाडी हॉस्पिटलमार्गे गुरुकुल कॉलेजकडून घाटकोपर पूर्व विभागात काढण्यात आली

आर टी ओ में डॉयवर के खिलाफ 5 वर्ष में 14 हजार 947 शिकायत दर्ज

आर टी ओ में डॉयवर के खिलाफ 5 वर्ष में 14 हजार 947 शिकायत दर्ज

संवाददाता

मुंबई: यात्रीयो के शाथ ठीक बर्ताव न करने वाले टॅक्सी, आॅटोरिक्षा, और सार्वजनिक यात्री बस डॉयवर के खिलाफ मुंबईकरो ने शिकायत की बौछार लगा दी है. २0११-१२ से २0१५-१६ इन पाच वर्षो में मुंबई तीनों वर्षांत आरटीओ में कुल १४ हजार ९४७ शिकायत दर्ज की गयी है. इसमें अंधेरी आरटीओ की ५0 प्रतिशत शिकायत का समावेश है. मुंबई के रिक्षा, टॅक्सी, सार्वजनिक यात्री बस डॉयवर के खिलाफ यात्रीयो के साथ ठीक बर्ताव न किये जाने की शिकायत आरटीओ के टोल फ्री क्रमांकापर उपलब्ध होती है. यात्रीयो को इंकार करना भाडे, ठीक तरह से न बोलकर उल्टा व्यवहार करना, सही किराया न मांगना, बस स्टॉप पर न रोकना इस तरह की शिकायत आरटीओ के पास प्राप्त होती हैं. यात्री शिकायत कर सके, इसके लिए १८00२२0११0 यह टोल फ्री क्रमांक भी मुंबईकरों के लिए उपलब्ध करवाया गया है. इस क्रमांकपर २४ घन्टे सार्वजनिक सेवा देने वाले वाहन डॉयवर के खिलाफ, अंधेरी और वडाळा आरटीओ में कुल १४ हजार ९४७ शिकायत दर्ज की गयी है. इसमें ताडदेव आरटीओ में ३ हजार ९१, अंधेरी आरटीओ में ७ हजार ३३0 और वडाळा आरटीओ में ४ हजार ५२६ शिकायत दर्ज किया गया है. २0१५-१६ में कुल १हजार १२९ परमिट निलंबित किये जाने जानकारी दी गयी है.

मनपा कर्मचारियों को 30 हजार रूपये का बोनस और 7 वा वेतनआयोग लागू करने की मांग

मनपा कर्मचारियों को 30 हजार रूपये का बोनस और 7 वा वेतनआयोग लागू करने की मांग

संवाददाता

मुंबई / मनपा कर्मचारी, अधिकारी, अभियंता को दिवाली से पहले महंगाई का विचार करके सभी कों 30 हजार बोनस या सानुग्रह अनुदान दे । साथ ही मनपा चुनाव फरवरी 2017 में होने वाला है और इस चुनाव के पहले मनपा कर्मचारी अधिकारी कों 7 वा वेतन आयोग लागू करे और बकाया राशी देने की मांग म्युनिसिपल मजदूर संघ के अध्यक्ष रामदास आठवले और महासचिव प्रकाश जाधव ने महापौर स्नेहल आंबेकर और पालिका आयुक्त अजोय मेहता के पास की है ।

मुंबई में डेंग्यू के 296 और लेप्टो के 30 मरीज डेंग्य, लेप्टो से दो की मौत

मुंबई में डेंग्यू के 296 और लेप्टो के 30 मरीज डेंग्य, लेप्टो से दो की मौत

मुंबई / मुंबई में फ़िलहाल डेंग्यू और लेप्टोस्पायरेसिस बिमारी से लोग हैरान हुए है । सितंबर महीने के 25 दिन में ही डेंग्यू के 296 मरीज और लेप्टो के 30 मरीजों की जानकारी मनपा के आरोग्य विभाग ने दी है । इसी दौरान 21 सितंबर को डेंग्यू से एक 27 वर्षीय महिला और तर लेप्टो से 18 वर्षीय युवक का सायन अस्पताल में मौत हुई है । इस वजह से डेंग्यू से 5 और लेप्टो से 7 लोगों की इस साल मृत्यु हुई है । मुंबई में सितंबर महीने में 25 दिन में ही बुखार के 9796, मलेरिया के 717, ग्यास्ट्रो के 523, हेपेटायसिस के 108 मरीजो की पालिकेकडे नोंद हुई है । डेंग्यू की संख्या देखे तो डेंग्यू होने का प्रमाण पुरुषों में सबसे जादा है । 0 से 14 वर्ष के 52 मरीज डेंग्यू के पाये गये । इसमें 35 लड़के और 17 लड़की है । 15 से 29 वर्ष में 193 डेंग्यू मरीज पाये गये है इसमे 155 युवक और 38 युवती है । 30 से 44 वर्ष में 43 मरीजो को डेंग्यू हुआ इसमें 28 पुरुष और 15 महिला है, 45 से 59 तक के उम्र में 6 लोगों को डेंग्यू हुआ इसमें सभी पुरुष हैं । 60 वर्ष के ऊपर 2 लोगों को डेंग्यू हुआ उसमे एक पुरुष और एक महिला हैं ।

मुख्यमंत्र्यांना खुर्ची जाईल अशी भीती का वाटते? सचिन सावंत

मुख्यमंत्र्यांना खुर्ची जाईल अशी भीती का वाटते? सचिन सावंत

राज्यात विविध ठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत, हे मोर्चे मराठा समाजाच्या मागण्यांकरिता असून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीविरोधात नाहीत. तरीही मुख्यमंत्र्यांना खुर्चीची भिती का वाटत आहे, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. गांधीभवन येथे पत्रकारांशी बोलताना सचिन सावंत म्हणाले की,  मराठा समाज कितीही लढवय्या असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील व भाजपमधील मराठा नेते अतिशय भेदरलेले आणि दबलेले आहेत. खडसेंवरील कारवाईनंतर त्यात अधिकच भर पडली आहे, त्यामुळे मराठा या समाजातील‘म’ चा उच्चार करण्यासाही त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे या नेत्यांपासून मुख्यमंत्र्यांना कोणताही धोका नाही असे प्रतिपादन सावंत यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांना संघ परिवाराचा पूर्ण पाठिंबा आहे, त्यामुळे त्यांनी खुर्चीची भीती सोडून मराठा समाजाच्या मागण्याबाबत काय कारवाई करणार, याचे उत्तर द्यावे अशी मागणी सावंत यांनी केली आहे. पाच लाख मराठा तरूणांना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रशिक्षित करणार असे मुख्यमंत्री म्हणाले, पण फक्त मराठा समाजालाच त्याचा लाभ कसा होईल याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे अशी मागणी सावंत यांनी केली आहे. कौशल्य विकास कार्यक्रमानंतरही अनेक तरूणांना रोजगार मिळालेला नाही असे सावंत म्हणाले. 

व्यंगचित्रातून मराठा क्रांती मोर्चातील माता भगिनी आणि उरी दहशतवादी हल्ल्यातील शहिदांची हेटाळणी करणा-या शिवसेनेचा तीव्र निषेधः सचिन सावंत

व्यंगचित्रातून मराठा क्रांती मोर्चातील माता भगिनी आणि उरी दहशतवादी हल्ल्यातील शहिदांची हेटाळणी करणा-या शिवसेनेचा तीव्र निषेधः सचिन सावंत

शिवसेनाच महाराष्ट्राच्या राजकारणातील व्यंगचित्र

मुंबई, दि. 26 सप्टेंबर 2016: राज्यभरात उस्फूर्तेपणे निघणा-या मराठा क्रांती महामोर्चात सहभागी माता भगिनी आणि जम्मू काश्मीरच्या उरी येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या सैनिकांची दैनिक सामनाच्या व्यंगचित्रातून हेटाळणी करण्यात आली आहे, याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेनेचा तीव्र निषेध केला आहे. गांधीभवन येथे पत्रकारांशी बोलताना सचिन सावंत म्हणाले की,  शिवसेनेचे मुखपत्र‘सामना’च्या 25 सप्टेंबर 2016 रोजीच्या अंकात उत्सव या पुरवणीत  व्यंगचित्राद्वारे सध्याच्या मराठा समाजाच्या आंदोलनाची हेटाळणी तर करण्यात आली आहेच, परंतु या महामोर्चामध्ये सहभागी झालेल्या माता भगिनींची अवमाननाही करण्यात आली आहे. आपल्या न्याय मागण्यासाठी सकल मराठा समाजाने राज्यभरात विविध ठिकाणी आदर्शवत महा मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला मुका मोर्चा असे संबोधून या मोर्चात सहभागी लाखो माता भगिनींची अवमानना ‘सामना’च्या व्यंगचित्रातून कऱण्यात आली आहे. लाखोंच्या विक्रमी गर्दीचे अत्यंत शिस्तबध्द आणि शांततेने निघणारे मोर्चे ऐतिहासीक आहेत. या मोर्चात सहभागी होणा-या माता भगिनी स्वतःला शिवराय आणि भिमरायाची लेक समजतात पण शिवसेनेला शिवरायही कळले नाहीl आणि भिमरायही कळले नाहीत, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेला राहिला नाही अशी टीका सावंत यांनी केली. व्यंगचित्रातून या महामोर्चाची हेटाळणी करणे म्हणजे मोर्चात सहभागी होणा-या लाखो मराठा माता-भगिनी आणि बांधवांचा अपमान करणे आहे अशा विकृत प्रवृत्तींचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे. शिवसेना स्वतःच एक व्यंगचित्र झाली आहे, असे सावंत म्हणाले.  फक्त मराठा माता भगिनीच नाही तर उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा अवमानही या व्यंगचित्रातून करण्यात आला आहे. उरी येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये भारतमातेचे वीर जवान शहीद झाले आहेत. महाराष्ट्राच्या चार सुपुत्रांनाही दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. संपूर्ण देश जवानांच्या मृत्युमुळे दुःखात असताना ‘सामना’सारख्या वर्तमानपत्राने अत्यंत बेजबाबदारपणे व्यंगचित्रातून शहिदांची हेटाळणी करणे हे चुकीचे असून शिवसेनेने माफी मागावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे

मुस्लीम आणि मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका अप्रमाणिकः नसीम खान

मुस्लीम आणि मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका अप्रमाणिकः नसीम खान   मुंबई दि. 26 सप्टेंबर 2016   मुस्लीम आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबात राज्य सरकार गंभीर नाही. सरकारने तात्काळ मुस्लीम आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास काँग्रेस पक्ष राज्यभरात सरकारविरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री नसीम खान यांनी दिला आहे.  गांधीभवन येथे पत्रकारांशी बोलताना नसीम खान म्हणाले की काँग्रेस सरकारने मुस्लीम आणि मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र राज्यात आलेल्या भाजप सरकारने काँग्रेस सरकारने काढलेल्या आरक्षणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर न केल्याने मुस्लीम समाजाचे आरक्षण बंद झाले. काँग्रेस पक्षाने विधिमंडळात आणि विधिमंडळाच्या बाहेर मुस्लीम आरक्षणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे अशी मागणी वारंवार केली. मात्र भाजप सरकारला मुस्लिमांना आरक्षण द्यायचेच नसल्याने त्यांनी अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधानसभेत बिल आणले नाही. काँग्रेस सरकारने दिलेले आरक्षण भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाले, असा आरोप नसीम खान यांनी केला आहे.   मुंबई हायकोर्टाने सुध्दा मुस्लिमांना दिलेले शैक्षणिक आरक्षण लागू करण्यास मंजुरी दिली आहे. मुस्लिमांना धर्माच्या आधारावर नाही तर सामाजिक आणि आर्थिक मागास असल्याच्या आधारावर काँग्रेस सरकारने पाच टक्के आरक्षण दिले होते.  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत बोलताना देशातल्या मुस्लिमांच्या विकासाबाबत बाजू मांडली आहे. पण भाजप सरकारचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिमांच्या विकासाच्या गप्पा मारतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र मुस्लिमांच्या हक्काचे आरक्षण देत नाहीत. मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका तात्काळ स्पष्ट करावी अशी मागणी नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.