डान्स बार बंदीसंदर्भात राज्य सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव: विखे पाटील
अहमदनगर, दि. 26 नोव्हेंबर 2015:
डान्स बारसंदर्भात राज्य सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्याने ते सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडू शकले नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
यासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयावर बोलताना ते म्हणाले की, डान्स बार पुन्हा सुरू होऊ नये, अशीच जनभावना सर्वत्र दिसून येते आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालानंतर राज्य सरकारने नवीन कायदेशीर मार्गांची चाचपणी करण्याची गरज आहे. राज्य सरकार याबाबत जनतेशी प्रामाणिक असेल तर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात नवे पर्याय घेऊन येईल, अशी आशा आहे. डान्स बार बंदीसंदर्भात त्यांची इच्छाशक्ती नागपूर अधिवेशनात स्पष्ट होईल.
No comments:
Post a Comment