Tuesday, 24 November 2015

६.१२.२०१५ रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या ६ विशेष गाड्यांचे नियोजन

६.१२.२०१५ रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
मध्य रेल्वेच्या ६ विशेष गाड्यांचे नियोजन 

६.१२.२०१५ रोजी  होणाऱ्या भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तप्रवाशांची अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन मध्य रेलवेने छत्रपती शिवाजी टर्मिनस / दादर ते सेवाग्राम - अजनी -नागपूर अशा  6 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.विशेष गाड्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे. 

1.विशेष गाडी क्रमांक 01069 छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई येथून 6.12.2015 रोजी सायं 04.05 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 08:10 वाजता अजनी येथे पोहोचेल.
2. विशेष गाडी क्रमांक 01071 छत्रपती शिवाजी टर्मिनसमुंबई येथून 6.12.2015 रोजी सायं. 6.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता सेवाग्राम येथे पोहोचेल.
3. विशेष गाडी क्रमांक.01073 दादर, मुंबई येथून 6/7.12.2015 मध्य रात्री 12.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी (7.12.2015) सायं 06.00 वाजता नागपूरला पोहोचेल.
4. विशेष गाडी क्रमांक 01075 छत्रपती शिवाजी टर्मिनसमुंबई येथून 7.12.2015 रोजी दुपारी 12.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायं 03.30 वाजता नागपूरला पोहोचेल.
5. विशेष गाडी क्रमांक.01083 मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून 8.12.2015 रोजी सायं 06.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.10 वाजता नागपूरला पोहोचेल.
6. विशेष गाडी क्रमांक.01085 दादर, मुंबई येथून 7/8.12.2015 मध्य रात्री 12.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी (8.12.2015) सायं 06.00 वाजता नागपूरला पोहोचेल.
विशेष गाड्यांसाठी थांबे :
दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला,मुर्तजापूर, बडनेरा, धामणगाव,पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी.

सर्व अनारक्षित विशेष गाड्या 12 जनरल सेकंड क्लाससह धावतील. 
--- --- --- --- --- --- --- --- ---
दिनांक: 24 नोव्हेंबर, 2015

ही बातमी जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई द्वारे प्रकाशित 

No comments:

Post a Comment