प्रारुप विकास आराखडा 2034 च्या पुनर्रचनेअंतर्गत
नामनिर्देशित सर्वेक्षणाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचा खुलासा
बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रारुप विकास आराखडा 2034 च्यापुनर्रचनेअंतर्गत नामनिर्देशित आरक्षणामधील चुकांचे परीक्षण हाती घेतले आहे. सदरपरीक्षण हे सुमारे 8500 नामनिर्देशनांबद्दलचे असून विभाग कार्यालयातील अभियंते वनगर रचनाकार यांनी संयुक्तपणे नामनिर्देशनांची जागेवर पडताळणी करुन पूर्ण केलेआहे. त्यातील आवश्यक दुरुस्तीबद्दल विभागांनी आपल्या अभिप्रायांची नोंद केलीअसून सदर नोंदीबद्दल विकास नियोजन विभागाने योग्य त्या शिफारशी केल्याआहेत.
सदर नामनिर्देशनांची यादी तसेच त्यातील दुरुस्त्यांबद्दलच्या शिफारशीमहानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आल्यानंतर त्याबद्दल पुढीलअभिप्राय प्राप्त झाले असून त्यांचे परिक्षण करण्यात येत आहे. सदर पाहणीदरम्यान असे आढळले आहे की, काही नामनिर्देशनांचा चुकीचा अर्थ लावण्यात आलाअसून त्याबद्दल काही शंका राहिल्या आहेत. सदर गैरसमजांबद्दल तसेच उपस्थितशंकाबद्दल महानगरपालिका खालील खुलासा करु इच्छिते.
- निर्देशन सर्वेक्षण ऑक्टोबर 2015-
अशा मोठ्या स्वरुपाचे विभाग स्तरावरील काम प्रथमच हाती घेण्यात आले,ज्यामध्ये नगर रचनाकार व विभाग कार्यालयातील अभियंते यांचे मार्फत प्रारुपविकास आराखड्यातील सुमारे ८५०० निर्देशनाची जागेवर प्रत्यक्ष पाहणी करुन त्याबाबत सद्यस्थितीचा अहवाल तयार करण्यात आला. त्यानुसार नामनिर्देशनातील त्रुटी / चुकांमधील सुधारणा करण्यात आल्या. उपरोक्त अहवालावर प्रमुख अभियंता(विकास नियोजन) यांचे मार्गदर्शनाखाली सदर दुरुस्त केलेल्या प्रत्येक त्रुटीची तपासणी, ही मंजूर पुनर्रचित विकास आराखडा १९९१ चा मुख्य आधार घेऊन व त्याबाबत निश्चित केलेला मार्गदर्शक तत्वांनुसार करण्यात आली.
अंततः उपरोक्त सर्वेक्षणावर जनतेकडून निरिक्षणे जाणून घेण्याचे प्रशासनामार्फत ठरविण्यात आले. त्यानुसार अंतिम केलेले निर्देशन सर्वेक्षण हे महापालिकेमधील गटनेत्यांसमोर ठेवण्यात आले. सदर सर्वेक्षण दि. ३०.१०.२०१५ रोजी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध् करण्यात आले व त्यानंतर दि. ०७ नोव्हेंबर २०१५ च्या वर्तमानपत्रातील सूचनेनुसार जनतेला सदर सर्वेक्षणावर निरिक्षणे दाखल करण्यासाठी दि. ३०.११.२०१५ ही अंतिम मुदत ठेवण्यात आली.
नामनिर्देशन सर्वेक्षणातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे:
- प्रारुप विकास आराखड्यामधील अहवालामध्ये `नामनिर्देशन’ म्हणजे``सार्वजनिक उद्दिष्टासाठी वापराखालील जागा अथवा समायोजन आरक्षण विकास तरतुदी अंतर्गत सार्वजनिक उद्दिष्टांसाठी अंशतः वापराची जागाअथवा सार्वजनिक वापराकरिता समुचित प्राधिकरणाच्या ताब्यात असलेली जागा आणि विकास आराखड्यामध्ये दर्शविलेले" तर ``आरक्षण’’ म्हणजे``सार्वजनिक प्रयोजनासाठी विकसित करावयाचा भूखंड आणि त्याप्रमाणेसार्वजनिक प्रयोजनासाठी नकाशावर दर्शविलेला अथवा नियमावलीमध्ये तरतुदीनुसार’’. महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्यानामनिर्देशन सर्वेक्षणामध्ये कोणतीही आरक्षणे प्रस्तावित केलेली नाहीत.तथापि, फक्त चुकीच्या नामनिर्देशनांची दुरुस्ती प्रस्ताविण्यात आलेली आहे.उदा. जहांगीर आर्ट गॅलरीच्या ऐवजी चुकून पाळीव प्राण्यांचे इस्पितळ असेनामनिर्देशन नमूद करण्यात आले होते. ती चूक दुरुस्त करण्याचे प्रस्ताविलेआहे.
- नामनिर्देशनांस अंतिम स्वरुप देताना मंजूर पुनर्रचित विकास आरखडा1991 (S.R.D.P. 1991) चा मूळ आधार घेण्यात आलेला आहे.
- नामनिर्देशने ही वेगवेगळ्या रंगामध्ये व तिरप्या रेषांनी विकास आराखड्यातदर्शविण्यात येतात. तर काही प्रसिध्द ठिकाणांची नावे विकास आराखड्यातदर्शविण्यात येतात. प्रसिध्द ठिकाणांची नावे आणि नामनिर्देशने या विकासआराखड्यातील दोन भिन्न बाबी आहेत. बरीच प्रसिध्द धार्मिक स्थळे ही1991 च्या मंजूर पुनर्रचित विकास आराखड्यामध्ये नामनिर्देशित केलेलीनसून मात्र त्यांची नावे दर्शविण्यात आलेली आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता नसेल, ती अंतिम विकास नियोजन आराखडा 2034मध्ये कायम ठेवण्यात येतील.
- सर्व पुरातन वारसा जतन वास्तु ह्या विकास आराखड्यामध्ये न दर्शवितात्यांची यादी अंतिम विकास आराखड्यास जोडण्यात येईल.
- निवासी, वाणिज्य किंवा औद्योगिक पट्टे जरी विकास आराखड्यातदर्शविलेले असले तरी त्या पट्टयांमध्ये समाविष्ट केलेली जागा म्हणजे तीजागा आरक्षित केली असे होत नाही. ही चूक नव्हे. सभोवतालचा पट्टा वजमिनीचा वापर ह्यांच्यामध्ये गल्लत केली जात आहे अणि चुकीचा अर्थ काढण्यात येत आहे. नागरिकांना विनंती करण्यात येते की, ह्याबाबतीत गोंधळून जाऊ नये. प्रत्येक जमिनीचा भूभाग हा कोणत्या ना कोणत्या तरी पट्टयामध्ये समाविष्ट असतोच व आरक्षणे, नामनिर्देशने तसेच रस्ते यांचे क्षेत्र देखील सभोवतालच्या पट्टयामध्ये समाविष्ट असते.
- मंजूर सुधारीत विकास आराखडा 1991 मध्ये दर्शविलेल्या मोकळ्या जागा ज्या मनोरंजन मैदानाकरिता नामनिर्देशित आहेत त्या मनोरंजन मैदान म्हणून महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध प्रकाशित केलेल्या यादीत कायम ठेवण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, हॉर्निमन सर्कल हे मंजूर पुनर्रचित विकास आराखडा 1991 मध्ये मनोरंजन मैदानाकरिता नामनिर्देशित असल्यामुळे ते महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या नामनिर्देशनाच्या यादीत मनोरंजन मैदान म्हणनूच कायम ठेवण्यात आलेले आहे. तसेच, विकास नियंत्रण नियमावली, 1991 नुसार मनोरंजनमैदानाच्या क्षेत्रफळाच्या 15 टक्के इतके बांधकाम अनुज्ञेय आहे. परंतु,सुधारीत प्रारुप विकास नियंत्रण नियमावली 2034 मध्ये सुरक्षा चौकी वशौचालय वगळता सध्या अनुज्ञेय असलेल्या 15 टक्के बांधकामास भविष्यात अटकाव करण्याकरिता योग्य तो फेरबदल करण्याचा विचार आहे.
- खाजगी भूभागावर असलेल्या सुविधा, नकाशावर दर्शविण्यात आलेल्या नाहीत. तथापि, अशा सुविधा, त्यांच्या अस्तित्वास अनुसरुन शहरी सुविधा म्हणून गणण्यात येतील. तसेच त्याविषयीचा विकास नियोजन दृष्टीकोन हा नागरिकांच्या निरीक्षणासापेक्ष विचाराधीन आहे.
- काही नामनिर्देशनाच्या त्रुटी ह्या संयुक्त वापरासाठी दर्शविण्यासाठीचे नामनिर्देशन नसल्यामुळे झालेल्या आहेत. त्यामुळे अश्या संयुक्त वापराच्या नामनिर्देशनासाठी नामनिर्देशनांची संख्या वाढविणे योग्य नसून, `भाग’ आणि/किंवा `खाजगी’ अशा शब्दांचा संयुक्त वापरासाठी, जसे `निवासी’ आणि `वाहनतळ’ हे `वाहनतळ भाग’ म्हणून नामनिर्देशीत करावयाचे विचाराधीन आहे.
- मार्गदर्शक तत्वे व टिपाः
नामनिर्देशन विभाग पहाणी अहवाल अंतिम करण्याकरिता मार्गदर्शक तत्वे वटिपा खालीलप्रमाणे ठरविण्यात आले आहेत.
मार्गदर्शक तत्वे -
- प्रारुप विकास नियोजन आराखडा – 2034 मध्ये दर्शविलेले नामनिर्देशन जर1991च्या मंजूर पुनर्रचित विकास नियोजन आराखडयामध्ये देखील नामनिर्देशन म्हणून दर्शविलेले असल्यास ते नामनिर्देशन म्हणून कायम ठेवण्यात यावे.
- प्रारुप विकास नियोजन आराखडा – 2034 मध्ये दर्शविलेले नामनिर्देशन जर मंजूर पुनर्रचित विकास नियोजन आराखडा 1991 मध्ये आरक्षण म्हणून दर्शविले असेल व गेल्या 20 वर्षामध्ये विकसित झाले असेल, तर ते नामनिर्देशन म्हणून कायम ठेवण्यात यावे.
- प्रारुप विकास नियोजन आराखडा 2034 मध्ये दर्शविलेले नामनिर्देशन जर मंजूर पुनर्रचित विकास नियोजन आराखडा 1991 मध्ये आरक्षण अथवा नामनिर्देशन म्हणून दर्शविले नसेल, तर ते सभोवतालच्या पट्टयामध्ये समाविष्ट म्हणून दर्शवावे.
- प्रारुप विकास नियोजन आराखडा 2034 मध्ये दर्शविलेले नामनिर्देशन जर मंजूर पुनर्रचित विकास नियोजन आराखडा 1991 मध्ये आर क्षण अथवा नामनिर्देशन म्हणून दर्शविले नसेल, परंतु बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे असेल तर ते नामनिर्देशन म्हणून कायम ठेवण्यात यावे.
- प्रारुप विकास नियोजन आराखडा 2034 मध्ये दर्शविलेले नामनिर्देशन जर मंजूर पुनर्रचित विकास नियोजन आराखडा 1991 मध्ये आर क्षण अथवा नामनिर्देशन म्हणून दर्शविलेले नसेल, परंतु शासनाच्या मालकीचे अथवा शासनाच्या जमिनीवर विकसित केले असल्यास ते नामनिर्देशन म्हणून कायम ठेवावे.
टीपः
खालील टिपांचा समावेश करुन सदर सर्वेक्षण महापालिकेच्या संकेतस्थळावरप्रसिद्ध करण्यात आलेले आहे:
- नामनिर्देशन कुठल्याही अधिकृत / अनधिकृत विकासाची वैधता दर्शवितनाही.
- तसेच चुका किंवा वगळलेले नामनिर्देशनांबाबत वैध कागदपत्रांच्या पडताळणीपश्चात योग्यतेनुसार निर्णय घेण्यात येईल.
- प्रसिद्ध केलेल्या प्रारुप विकास आराखडा 2034 मध्ये दर्शविलेले खाजगी भूखंडावरील नामनिर्देशन, मंजूर पुनर्रचित विकास आराखडा 1991 मध्येनामनिर्देशित किंवा आरक्षित नसल्यास, लगतच्या पट्टयात अंतर्भूत करण्यातआले आहे.
- अभिन्यासातील मनोरंजन मैदान त्या अभिन्यासातील रहिवाश्यांच्यावापराकरिताच उपलब्ध असेल व त्यांच्या भूसंपादनाची जबाबदारी सार्वजनिक प्राधिकरणाची नसेल.
- पुरातन वारसा जतन वास्तुंची यादी विकास आराखड्यास स्वतंत्रपणे जोडण्यात येईल.
No comments:
Post a Comment