Saturday, 30 January 2016

देवनार डंम्पिंग ग्राऊंडच्‍या आगीमुळे पर्यावरणावर झालेल्‍या परिणामांची चौकशी करा

देवनार डंम्पिंग ग्राऊंडच्‍या आगीमुळे पर्यावरणावर झालेल्‍या परिणामांची चौकशी करा

मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार आणि गटनेते मनोज कोटक यांची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई, दि 30

देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्‍या आगीची पाहणी केल्‍यांनतर मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार आणि महापालिका भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी या आगीमुळे पर्यावरणावर झालेल्‍या परिणामांची चौकशी करण्‍याची मागणी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे केली.

देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग अद्याप विझलेली नाही. आज सायंकाळी साडे पाचच्‍या सुमारास घटना स्‍थळी जाऊन मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार आणि गटनेते मनोज कोटक यांच्‍यासह नगरसेवक व भाजपा पदाधिकाऱयांनी आगीची पाहणी केली. यावेळी त्‍यांच्‍या सोबत घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाचे उपायुक्‍त प्रकाश पाटील यांच्‍यासह अग्निशमन दलाचे आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते. गेले तीन दिवस ही आग विझविण्‍याचे काम प्रचंड मेहनतीने अग्निशमन दलाचे जवान करीत आहेत. अग्निशमन दलाच्‍या पंधरा गाडया घटना स्‍थळी काम करीत असून अजूनही ही आग धुमसते आहे. उद्या पर्यंत ही आग पुर्णपणे विझेल अशी माहिती अग्निशमन दलाच्‍या अधिकाऱयानी आमदार अॅड आशिष शेलार यांना यावेळी दिली.

दरम्‍यान, घटनास्‍थळाला भेट दिल्‍यानंतर आमदार अॅड आशिष शेलार यांनी तात्‍काळ मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपर्क साधून ही आग लागली कशी, ती विझविण्‍यास विलंब का झाला. तसेच या आगीमुळे झालेल्‍या प्रदुषणाचा मुंबईकरांवर झालेला परिणाम, या सर्व बाबींचा विचार करून या आगीची चौकशी करण्‍यात यावी अशी मागणी केली आहे;

No comments:

Post a Comment