Monday, 18 January 2016

साखर कारखाना निवडणुकीतील विजय म्हणजे ऊस उत्पादकांच्या विश्वासाचे निदर्शक! खा. अशोकराव चव्हाण यांची प्रतिक्रिया

साखर कारखाना निवडणुकीतील विजय म्हणजे ऊस उत्पादकांच्या विश्वासाचे निदर्शक!
खा. अशोकराव चव्हाण यांची प्रतिक्रिया
मुंबई, दि. 18 जानेवारी 2015:
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतदारांनी विरोधकांना धूळ चारत शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच्या सर्व 21 उमेदवारांना विजयी करणे म्हणजे ऊस उत्पादक शेतक-यांच्या विश्वासाचे निदर्शक असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना खा. चव्हाण म्हणाले की, या निवडणुकीत विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. माझ्यावर अशोभनीय पद्धतीने व्यक्तीगत टीका केली. परंतु, मतदारांनी या प्रकाराला थारा न देता काँग्रेस विचारधारेच्या शेतकरी विकास पॅनलवर विश्वास दर्शविला. व्यक्तीगत द्वेषाने पछाडलेल्या मंडळींनी महाआघाडी स्थापन केली. ऊस उत्पादकांचा विश्वास आमच्या पाठीशी असल्याने अशा दहा आघाड्या स्थापन झाल्या तरीही फरक पडणार नाही. राजकारणात विरोध वैचारिक स्वरूपाचा असावा; व्यक्तीगत असू नये. या पश्चातही ज्या मंडळींनी माझ्याविरूद्ध निराधार आरोप केले, खालच्या पातळीवर जाऊन टीका केली; त्यांच्याविरूद्ध मनात आकस नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची अधिकाधिक प्रगती करून त्याचा प्रत्यक्ष फायदा ऊस उत्पादकांना मिळवून देण्याचा हेच आपले उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. या निवडणुकीत सभासदांनी दाखविलेल्या प्रचंड विश्वासाबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले

No comments:

Post a Comment