मुंबईतील सर्व मोकळे भूखंड महानगरपालिकेकडेच राहिले पाहिजेत - संजय निरुपम …
ओपन स्पेस पॉलिसी ताबडतोब रद्द करावी - संजय निरुपम…
शिवसेना भाजपाला मुंबईतील १०६८ मोकळे भूखंड कोणत्याना कोणत्या कारणाने गिळंकृत करून त्यावर धंदा करायचा आहे. हा दोघांचा डाव आहे. याचा मी निषेध व निंदा करतो. काँग्रेसची अशी मागणी आहे की मुंबईतील सर्व मोकळे भूखंड महानगरपालिकेकडेच राहिले पाहिजेत. असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम पत्रकार परिषदेत म्हणाले. ते पुढे म्हणाले की मुंबईतील सर्व मोकळे भूखंड सर्वसामान्य नागरिकांसाठी व मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध व्हावेत. हाच आमचा उद्देश्य आहे. शिवसेना व भाजपा या सर्व भूखंडावर ताबा मिळवू पाहत आहे. मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनतेची दिशाभूल करत आहेत. २३५ भूखंड परत घेण्याचे मुख्यमंत्री नाटक करत आहेत. हे सर्व भूखंड शिवसेना भाजपा नेत्यांकडेच आहेत म्हणून आमची अशी मागणी आहे की ओपन स्पेस पॉलिसी ताबडतोब रद्द करावी. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर असताना काँग्रेसचे सर्व नगरसेवक व्यस्त असताना मुद्दामून मोकळ्या भूखंडाचा प्रस्ताव मुंबई महानगर पालिकेत मांडला व त्यांच्याच सर्व नगरसेवकांनी पाठींबा दिला व प्रस्ताव मंजूर करून घेतला. हे मोठे षड्यंत्र शिवसेना व भाजपाने रचले. याचा मी निषेध करतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की मोकळ्या भूखंडांवर अजिबात बांधकाम झाले नाही पाहीजे व माझे त्यांना आवाहन आहे की त्यांच्याच नेत्याने मोठे बांधकाम करून मातोश्री क्लब बांधला आहे तो त्यांनी पडून दाखवावा. उद्धव ठाकरे यांना सर्व मोकळ्या भूखंडांवर कोणाकोणाचा ताबा आहे व किती बांधकाम झाले आहे याची सर्व माहिती आहे. त्यांच्या आदेशावरूनच ओपन स्पेस पॉलिसीचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेत सादर करून मंजूर करून घेतला गेला.
संजय निरुपम पुढे म्हणाले की भाजपा खूप खालच्या पातळीचे व असभ्य राजकारण करत आहे. राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर आले असताना त्यांना राहण्यासाठी सह्याद्री अथितिग्रह मिळावे म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले व ईमेलही केला. पण त्यांच्याकडून किंवा त्यांच्या कार्यालयातून काहीही उत्तर आले नाही. हे अत्यंत चुकीचे व दुर्देवी आहे. याची मी निंदा व निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडिया व मुख्यमंत्री स्टार्ट अप इंडियाच्या गोष्टी करतात आणि साध्या एका ईमेलचे उत्तरही त्यांना देता येत नाही. मी आतापर्यंत अनेक पत्र सीएम ना पाठविली पण त्यांच्या कार्यालयातून साधी पोचपावतीही मिळत नाही. भाजपा हे असभ्य व अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करत आहे.
ते पुढे म्हणाले की राहुल गांधी हे एन एम कॉलेजला विद्यार्थ्यांशी संवाद साधायला गेले असताना भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी 'मोदी-मोदी' चा नारा दिला. याचा मी निषेध करतो. एन एम कॉलेजचा कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नव्हता. पण हे भाजपाचे असे वागणे निंदनीय आहे. मुख्यमंत्र्यांनी याचा गंभीरपणे विचार करावा व सभ्य आणि चांगले राजकारण करावे.
No comments:
Post a Comment