Monday, 11 January 2016

नवनिर्वाचित आमदारांसह कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी घेतली पक्षश्रेष्ठींची भेट!

नवनिर्वाचित आमदारांसह कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी घेतली पक्षश्रेष्ठींची भेट!
मुंबई, दि. ११ जानेवारी २०१६:
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी आज महाराष्ट्र विधान परिषदेतील नवनिर्वाचित ३ आमदारांसह पक्षश्रेष्ठींची सदिच्छा भेट घेतली.
खा. अशोक चव्हाण, आ. अमरीश पटेल, आ. भाई जगताप, आ. सतेज पाटील यांनी आज कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे महासचिव व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट घेतली. तीनही नेत्यांच्या भेटीत महाराष्ट्रातील वर्तमान राजकीय परिस्थितीवर अनौपचारिक चर्चा झाली. खा. अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना महाराष्ट्रात आज झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने सर्वाधिक १०७ जागा जिंकल्याची माहिती दिली. त्यावर कॉंग्रेस अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment