Saturday, 30 January 2016

सरकारचे पॅकेज फसवे व अपयशी; शेतकरी आत्महत्यांचे चिंताजनक प्रमाण कायमच

सरकारचे पॅकेज फसवे व अपयशी; शेतकरी आत्महत्यांचे चिंताजनक प्रमाण कायमच
या पत्रकार परिषदेत खा. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर अजूनही कायम असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, सरकारने शेतक-यांसाठी अनेक पॅकेज जाहीर केले. परंतु, या पॅकेजनंतरही शेतकरी आत्महत्यांचे चिंताजनक प्रमाण कमी झालेले नाही. याचाच अर्थ सरकारच्या पॅकेजमुळे शेतक-यांचे नैराश्य कमी झालेले नाही. सरकारने मदत जाहीर केल्यानंतरही एकट्या मराठवाड्यात विभागात जानेवारीच्या पहिल्या 22 दिवसांत 70 शेतक-यांना आत्महत्या केल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने सरकारच्या मदत योजना फसव्या व अपयशी असल्याचे स्पष्ट होते.
सरकारच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी आजवर साहित्यिक व कलावंत राजीनामे देत होते. आता सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी शेतकरी शेतीनिष्ठ व कृषिभूषण पुरस्कार परत करू लागले आहेत. अलिकडेच विदर्भातील दोन शेतकऱ्यांनी पुरस्कार परत केल्याच्या घटना घडल्या आहेत. हा प्रकार शेतीप्रधान देशातील कोणत्याही लोकनियुक्त सरकारसाठी शोभनीय नाही, असेही खा. अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment