ईशान्य भारतातील दिग्दर्शकांचा पत्रकारांशी संवाद
३० जानेवारी,२०१६
मिफ्फ २०१६ च्या "टेलिंग टेल्स फ्रॉम नॉर्थ इस्ट अंतर्गत "दाखविण्यांत आलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांविषयी आज मिफ्फ मिडिया सेंटर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. ईशान्य भारतात चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने फिल्म डीव्हिजनच्या वतीने ईशान्य भारतात चित्रपटनिर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी केलेले निवडकमाहितीपट तसेच लघुपट मिफ्फ २०१६ च्या "टेलिंग टेल्स फ्रॉम नॉर्थ इस्ट " या विभागात दाखवण्यात आले.ललियनपुई दिग्दर्शित "ट्रॅनक्विल्टी", अल्द्विर दिग्दर्शित "अ मिष्टी वोएज", अनुंग्ला दिग्दर्शित "अन टायटल्ड", तीयाकुंझुक आओ दिग्दर्शित "सोंग्स ऑफ मार्बल्स", मेगोत्सोलिए दिग्दर्शित "अनुन्ग्ला", अरूपमझुमदार दिग्दर्शित "बर्थ ऑफ अ पोएम" या दिग्दर्शकांचा यात समावेश आहे.
ईशान्य भारतातील निसर्ग सौंदर्य आणि इथले बौध्दिक कौशल्य जगासमोर प्रदर्शित करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने आयोजित असे महोत्सव आणि कार्यशाळा एक उत्तम व्यासपीठ असल्याचे मिझोरामच्या दिग्दर्शिका अनुन्ग्ला यांनी यावेळी सांगितले. मिझोराम हे शांततापूर्ण राज्य म्हणून सरकारने नुकतेच घोषित केले असून आपल्या आवडत्या विषयावर चित्रपट बनविण्याचे स्वातंत्र्य मिझोराम मध्ये मिळत असल्याचे त्या म्हणाल्या. या कार्यशाळेनंतर चित्रपट निर्मितीच्या बाबतीत मिझोराम सरकारने अधिक सकारात्मक धोरण स्विकारले असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागालँड मध्ये घडणा-या काही प्रतिकूल घटनांपैकी खंडणीसारखा मुद्दा आपण आपल्या “साँग्स ऑफ मार्बल्स” या माहितीपटातून अनोख्या पध्दतीने सादर केल्याचे नागालँडचे दिग्दर्शक तिया कुंब्जुक यांनी यावेळी सांगितले. ईतर दिग्दर्शकांनी सुध्दा यावेळी चित्रपट निर्मितीच्या आपल्या अनुभवाबद्दल मनोगत व्यक्त केले.
ईशान्य भारतात चित्रपट निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने फिल्म डिव्हिजनच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यांत आले होते, असे फिल्म डिव्हिजनचे प्रभारी उप महा संचालक (पूर्व विभाग) जोशी जोसेफ यांनी सांगितले. या कार्यशाळेसाठी चित्रपट क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
ईशान्य भारतात आयोजित केलेल्या चित्रपट निर्मितीच्या कार्यशाळेतील प्रतिनिधीनी केलेल्या निवडक माहितीपट डिव्हीडी स्वरुपात उपलब्ध होणार असल्याचे जोसेफ म्हणाले
No comments:
Post a Comment