Monday, 11 January 2016

नागरिकांनी शहरातील अनधिकृत कापडी फलक / भित्तीपत्रकांबाबत तक्रारी टोल फ्री क्र. १२९२ व १२९३ वर कराव्यात

नागरिकांनी शहरातील अनधिकृत कापडी फलक / भित्तीपत्रकांबाबत तक्रारी टोल फ्री क्र. १२९२ व १२९३ वर कराव्यात

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८, कलम ३२८/३२८ ए अंतर्गत जाहिरात फलकांना जाहिरात प्रदर्शित करण्याकरीता परवानगी देण्यात येते. तथापि, मुंबई शहरामध्ये अनधिकृतपणे रस्ते / पदपथावर बेसुमारमपणे कापडी फलक / भित्तीपत्रक लागत असल्याने जनहित मंच व इतर यांनी मा. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेनुसार महापालिकेस याबाबतीत काटेकोरपणे व कडकरित्या कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत.

या अनुषंगाने महापालिकेने नागरिकांना अशा तक्रारी करता याव्यात म्हणून टोल फ्री क्रमांक १२९२ व १२९३ उपलब्ध करुन दिले असून या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे महापालिकेने आवाहन केले आहे.

जर तक्रारदार नागरिकांना याबाबतीत भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधावयाचा असेल तर त्यांनी ०२२-२२६९१२९३ / ०२२-२२६९१२९१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही पालिकेने केले आहे.

No comments:

Post a Comment